Politics

महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर : वाचा कुणाला, कोणते खाते?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राज्यात दमदार यश मिळालेल्या महायुती सरकारचा घोळ आज दूर झाला आहे. मंत्रिपदाच्या शपथेनंतर तब्बल १३ दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आलेले आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आलेले आहे. अधिवेशन संपन्न होताच खातेवाटपाची घोषणा करण्यात आलेली आहे.

कॅबिनेट मंत्री
1】मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते
2】उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
3】उपमुख्यमंत्री अजित पवार – अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
4】 चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
5】राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास
6】हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण
7】चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
8】गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
9】गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
10】गणेश नाईक –  वन
11】दादाजी भुसे – शालेय शिक्षण
12】संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
13】धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
14】मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
15】उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
16】जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
17】पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
18】अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
19】अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
20】शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
21】आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
22】दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
23】अदिती तटकरे – महिला व बालविकास
24】शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम
25】माणिकराव कोकाटे – कृषी
26】जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
27】नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
28】संजय सावकारे – कापड
29】संजय शिरसाट – सामाजिक न्याय
30】प्रताप सरनाईक – वाहतूक
31】भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
32】मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
33】नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
34】आकाश फुंडकर – कामगार
35】बाबासाहेब पाटील – सहकार
36】प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री  (State Ministers)
37】माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
38】आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
39】मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
40】इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
41】योगेश कदम  – गृहराज्य शहर
42】 पंकज भोयर – गृहनिर्माण

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button