प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर

प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे विठ्ठल नामाचा महागजर
चोपडा –– चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढ एकादशी निमित्त “महोत्सव विठ्ठलाचा, महागजर विठ्ठलाचा”… वारकरी संप्रदायातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रुक्मिणी यांचा उत्सव साजरा करण्यात आला त्यामध्ये विठ्ठल नामाचा गजर, वारकरी संप्रदायातील पारंपारिक खेळ, भजन,अभंग, संत जनाबाई यांच्या ओव्या गायन, लेझीम ,टाळमृदुंग, रिंगण सोहळा,फुगडी ,भक्तीगीते, कलानृत्य विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सादरीकरण केले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून आपला सहभाग नोंदविला “माऊली माऊली” या नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तीमय झाले होते.
त्याप्रसंगी प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक रजीश बी. सर, उपमुख्याध्यापिका निखिला मॅम संस्थेचे समन्वयक श्री गोविंद गुजराथी, श्री शरद पाटील सर तसेच सौ. चेतना बडगुजर ( सूत्रसंचालन) व क्रीडाशिक्षक श्री समाधान माळी सर(रिंगण मार्गदर्शन), सौ. प्रियंका महाजन(प्रस्तावना) तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी बंधू यांचे मोलाचे सहकार्य लाभले…..