Other
रामेश्वर नगरात श्री रायरेश्वर महादेव मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात

रामेश्वर नगरात श्री रायरेश्वर महादेव मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात
अमळनेर(प्रतिनिधी) – शहरातील रामेश्वर नगर परिसरातील श्री रायरेश्वर महादेव मंदिराच्या महापूजा व भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक विक्रांत पाटील, प्रताप शिंपी, दादा पवार, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, अर्बन बँक चेअरमन रणजीत शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष योगेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते राकेश शेटे, गोकुळ पाटील, दिनेश शेटे, सोनू पाटील, भूषण मराठे, शरद पाटकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
रामेश्वर नगर मित्र परिवारासह परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत, मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले.






