अमळनेर येथे सामूहिक वंदे मातरम गीत गायन

अमळनेर येथे सामूहिक वंदे मातरम गीत गायन
अमळनेर प्रतिनिधी शासनाच्या कौशल्य रोजगार ,उद्योजकता आणि नाविन्यता विभाग सांस्कृतिक कार्यक्रम विभाग व संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीताला १५० वर्ष झाल्याबद्दल सार्ध शताब्दी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ३ हजार विद्यार्थ्यांनी सानेगुरुजी शाळेच्या मैदानावर सामूहिक वंदे मातरम गीत गायले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा होते.
व्यासपीठावर प पू महंत ईश्वरदास महाराज , जेष्ठ साहित्यीक कृष्णा पाटील , डी वाय एस पी विनायक कोते, गटविकास अधिकारी एन आर पाटील , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , पत्रकार बाबूलाल पाटील , खेळाडू मेघराज महाजन , जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी सौरभ उपासनी , प्रमुख वक्ते दिनेश नाईक , पंकज भावसार , आशिष चौधरी , दत्तात्रय सोनवणे , आय एम सी सदस्य बापू संदानशिव , प्रा दिलीप भावसार , एपीआय जीभाऊ पाटील, प्रभारी प्राचार्य व्ही. पी. वाणी, विस्तार अधिकारी प्रमोद पाटील, केंद्रप्रमुख रवींद्र पाटील ,शरद सोनवणे हजर होते.
सुरुवातीला भारत मातेचे पूजन करण्यात आले. त्यांनंतर तिरंगी फुगे ‘वंदेमातरम १५० वर्षे’ लिहिलेला फलक अवकाशात सोडण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय व वंदे मातरम च्या घोषणांनी एकच जल्लोष केला. ९ वाजून ५० मिनिटांनी सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम राष्ट्रीय गीत म्हटले. प्रमुख वक्ते दिनेश नाईक यांनी वंदे मातरम चा अर्थ सांगून देश अखंड ठेवण्याचे आवाहन केले. तर अध्यक्ष रुपेशकुमार सुराणा यांनी देशभक्ती जागृत ठेवून एकतेचे आवाहन केले. यावेळी आयोजित केलेल्या वंदे मातरम गीत गायन स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या कोमल तेजी , नाटिकेतील ऋतिक मानके , निबंध स्पर्धेतील रोशनी जाधव यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सानेगुरुजी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास महसूल विभाग ,पोलीस विभाग , शासकीय व तालुक्यातील खाजगी आयटीआय , तालुक्यातील किमान कौशल्य यांचे कर्मचारी व विद्यार्थी सानेगुरुजी शाळा , जी एस हायस्कूल , डी आर कन्याशाळेचे विद्यार्थी, रोटरी क्लब , महिला हौसिंग ट्रस्ट ,मंगळग्रह सेवा संस्था हजर होते.
तसेच यावेळी नम्रता निकम यांनी बाल विवाहमुक्त भारत करण्यासाठी सामूहिक शपथ घेतली. प्रास्ताविक प्राचार्य व्ही पी वाणी यांनी केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार नम्रता निकम यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शासकीय औ.प्र. संस्था अमळनेर येथील ए डब्ल्यू दुसने , मुख्यध्यपक संजीव पाटील , मुख्याध्यापिका अनिता बोरसे सर्व कर्मचारीनीं परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडला.






