अमळनेर येथे हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी जयंती उत्साहात साजरी

अमळनेर (पंकज शेटे)– आज २३ जानेवारी हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यसेनानी प्रखर राष्ट्रभक्त क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मशताब्दी जयंती अमळनेर येथील महाराणा प्रताप चौकात माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनात प्रथमच उत्साहात साजरी करण्यात आली.
आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी जयंतीचे औचित्य साधून शिवसेना अमळनेर च्या वतीने सकाळी स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. त्यानंतर दुपारी न्यू प्लॉट येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी महाराणा प्रताप चौकात शिवसैनिकांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथम त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून महापुरुषांना सर्व उपस्थितांनी अभिवादन केले. शिवसैनिकांच्या घोषणेने संपुर्ण परिसरात उत्साह व चैतन्याचे वातावरण दिसले. कार्यक्रम स्थळी अमळनेर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परिक्षीत बाविस्कर, शिवसेना गट नेते पंकज चौधरी, बांधकाम सभापती साहेबराव पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक श्रीराम चौधरी, गुलाब पाटील, नाविद शेख, सुयोग धनगर, दिपक चौगुले, बाळासाहेब संदानशिव, तुळशीराम हटकर, सुरज परदेशी, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, नगरसेविका अपूर्वा चौधरी, जालु चौधरी, सुनिल तडवी, अवि जाधव, पंकज शेटे,अरुण महाजन, दिपक चौधरी, भुषण कोळी, किरण गोसावी, हिराभाऊ पाटील, गुलाम नबी, राजु परदेशी, मराठा महासंघाचे मनोहर पाटील, राहुल कंजर, मनोज शिंगाणे, विलास कंखरे, राजा शेख, मिसबाह अली, जाकीर शेख, विपुल पाटील, सोनु चौधरी, स्वामी चौधरी, चेतन चौधरी, सनी चव्हाण, दिपक पाटील यांच्या सह ग्रामीण व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






