अमळनेर शालेय शासकिय तालुका स्तरीय व्हाॕलिबाॕल स्पर्धा संपन्न….

अमळनेर : अॕड ललिता पाटील इंटरनॕशनल स्कुल मध्ये दि.25 आॕगस्ट 2025 रोजी शालेय शासकिय तालुकास्तरीय व्हाॕलिबाॕल स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग व अमळनेर तालुका क्रीडा आयोजन समिती व ललिता पाटील स्कुल संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आल्या.या स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणुन अमळनेर पोलिस कर्तव्य दक्ष अधिकारी पोलिस निरीक्षक श्री.दत्तात्रय निकम साहेब , अॕड ललिता पाटील स्कुलचे सचिव व तथा संस्थाध्यक्ष प्रा. बापुसाहेब शाम पाटील सर , प्राचार्य श्री. डाॕ निरज चव्हाण , तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष व क्रीडा संयोजक श्री.एस पी वाघ सर यांच्या उपस्थित मैदान पुजन , श्रीफळ वाढवुन व फीत कापुन ,चेंडु टोलवुन करण्यात आलीं.उद्घाटनीय मनोगतातुन पी आय श्री. दत्तात्रय निकम साहेबांनी खेळाडूना मेहनत करुन ,चांगला व्यायाम करुन, खेळाडू ना चागले व्यासपीठ आहे.
त्यांनी जीवनात पुढे जावे असे संबोधले.
यावेळी १४ , १७ ,१९,वर्षाआतील एकुण १९ संघानी सहभाग घेतला.स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या .
अंतिम निकाल….
१४ मुले विजयी..एस एस पाटील मा.विदया.लोढवे
उपविजयी…श्री.एन टि मुंदडा ग्लोबल स्कुल अमळनेर
१७ मुले विजयी…साने गुरुजी विदयालय अमळनेर
उपविजयी….श्री एन टि मुंदडा ग्लोबल स्कुल अमळनेर
१९ मुले विजयी..प्रताप काॕलेज अमळनेर
या स्पर्धा यशस्वितेसाठी पंच म्हणुन श्री. मयुर बारस्कर , श्री जयेश मासरे ,श्री आर ए घुगे ,श्री क्षितिज सोनवणे , श्री.ज्ञानेश्वर महाजन , श्री मंच्छिंद्र पारधी ,श्री निखिल पाटील ,श्री हेंमत जाधव , सुयेश पाटील तर गुणलेखक म्हणुन केदार देशमुख सर ,श्री राजेश राठोड श्री योगेश पाटील , ममता पाटील ,सागर चावरिया , रमेश धनगर ,कृष्णा तुरे , मुनाफ तडवी , यांनी काम पाहीले.
आज स्पर्धातील विजयी खेळाडू हे जळगाव जिल्हा स्पर्धेत सहभागी होतील.
संपुर्ण स्पर्धेचे सुत्रसंचलन श्री एस पी वाघ सरांनी व आभार केदार सरांनी मानले.






