Crime
गिरणा पंपिंग परिसरात विसर्जनादरम्यान तरुण वाहून गेला; प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

गिरणा पंपिंग परिसरात विसर्जनादरम्यान तरुण वाहून गेला; प्रशासनाकडून शोधकार्य सुरू
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील वाघनगरातील रहिवासी राहुल रतिलाल सोनार हा आपल्या मित्रांसोबत गिरणा पंपिंग परिसरात गणेश विसर्जनासाठी गेला होता. विसर्जनावेळी तो नदीपात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात वाहून गेला. त्याच्यासोबत असलेला विश्वनाथ पाटील याला मात्र उपस्थित नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. तहसीलदार शीतल राजपूत यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रविवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू असली तरी अंधारामुळे ती थांबवावी लागली. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.






