आ.अनिल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती
जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून दिली जबाबदारी

महा पोलीस न्यूज । दि.२३ फेब्रुवारी २०२५ । राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी आमदार अनिल पाटील यांची संघटनेतील वरीष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना खान्देश विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्याच्या प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. यावेळी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील संघटन वाढीचा व सभासद नोंदणीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी येत्या काही दिवसांत जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदारांसह, अनेक माजी नगरसेवक, प.स. व झेड पी सदस्य यांच्या प्रवेशासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. येत्या मंगळवारी ना.अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येईल अशीही चर्चा झाली.
प्रसंगी जिल्हाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष योगेश देसले, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील हे उपस्थित होते.