आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त

आसोदा गोळीबार प्रकरणात निकाल; दोन आरोपी न्यायालयातून निर्दोष मुक्त
आसोदा | प्रतिनिधी
आसोदा येथील गाजलेल्या गोळीबार प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 89/2023 अन्वये दाखल करण्यात आलेल्या खटल्याचा निकाल अखेर न्यायालयाने दिला आहे. सदर प्रकरण सेशन केस नंबर 122/2023 अंतर्गत चालविण्यात येत होते.
या प्रकरणात भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत कलम 307, 504, 506, 34, 75, तसेच मुंबई पोलीस कायदा कलम 37 व 135 आणि आर्म्स अॅक्ट कलम 3/25 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले होते.
खटल्यादरम्यान सरकार पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या 10 साक्षीदारांच्या जबाबांची सखोल छाननी करण्यात आली. मात्र, साक्षी व पुरावे संशयाच्या पलीकडे दोष सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने आरोपी चेतन सुरेश आळंदे (उर्फ चिंग्या) व कैयुर कैलास पंधारे यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. केतन ढाके यांनी प्रभावी व मुद्देसूद युक्तिवाद करत सरकार पक्षातील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्या. तर सरकार पक्षाच्या वतीने अॅड. रमाकांत सोनवणे यांनी बाजू मांडली.
न्यायालयाच्या या निकालामुळे कायदेशीर प्रक्रियेतील पुराव्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.





