गणेशोत्सवानिमित्त ह.भ.प. प्रतिभाताई पाटील यांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवानिमित्त ह.भ.प. प्रतिभाताई पाटील यांच्या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी I गणेशोत्सवाच्या निमित्ताने ढेकू रोडवरील माधव नगर परिसरात ह.भ.प. प्रतिभाताई पाटील (सोनगीरकर) यांच्या जाहीर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कीर्तनाला भजनी मंडळासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रतिभाताई पाटील यांच्या प्रभावी वाणीतून उपस्थितांनी कीर्तनाचा आनंद घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष योगेश ठाकरे यांच्यासह रुद्र धनगर, भूषण साळुंके, राकेश फापोरेकर, भूषण पाटील, शरद पवार, यश पाटील, लोकेश ठाकूर, हर्षल पाटील, श्रेयस सोनार, कृष्णा सोनार, प्रमोद पाटील, विनोद केदार, बिकन कोळी, वैभव पवार, अभिजीत वाघ, रविकिरण पाटील, कल्पेश पाटील, शुभम पाटील, गणेश पाटील, दीप वारुडे, कुणाल धनगर, दर्शन गव्हाणे, तनिष गहिवरे आणि जयेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.






