शनिपेठ पोलीस ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाची संयुक्त कारवाई
जळगाव: शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटरच्या आवारामध्ये असणाऱ्या तंबाखू विक्री करणाऱ्या पान टपऱ्या जप्तीची कारवाई सतरा रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली होती मात्र. आज 19 रोजी कारवाई करण्यात आलेल्या पान टपरी चालकांनी पुन्हा पान टपऱ्या थाटल्याने त्यांच्यावर शनिपेठ पोलीस आणि महापालिका च अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाई करत कायमस्वरूपी पान टपऱ्या हटविल्याची कारवाई केली असून शहरातील इतर भागातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.
तंबाखुजन्य पदार्थांचे विक्री व विनियमन संदर्भात कोटपा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करणारे पान टपरी चालकाविरुद्ध कारवाई केली जळगाव शहरातील शैक्षणिक संस्था चे 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे पान टपरी चालकाविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत . पोलीस अधिक्षक डॉ. . माहेश्वर रेड्डी यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व . उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचे मार्गदर्शनातून दि.17 रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चौबे शाळा व मनपा शाळा क्रमांक 17 चे 100 मीटर परिसरातील पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व पथकाने दंडात्मक कारवाई केली. मात्र टपरी चालकांनी त्यांचे टपरी मध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच ठेवल्याने आज दिनांक 19 रोजी सकाळी 10 ते 12 वा. दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच जळगाव महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे संयुक्त कामगिरीतून शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत चौबे शाळा व महानगरपालिका शाळा क्रमांक 17 या शाळांचे 100 मीटर परिसरात असलेल्या 6 पान टपरी पालकांच्या पान टपऱ्या कायमस्वरूपी हटवून म.न.पा.ने ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.पुढील 2 दिवसात पोलीस स्टेशन हद्दीतील इतर शाळांची परिसरातील पान टपरी चालकांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येणार आहे.
यांच्यावर झाली कारवाई
आज कारवाईत चौवे शाळेजवळील इकबाल शेख उस्मान शेख रा. इस्लामपुरा, शंकर लिंगा गवळी रा. गवळीवाडा जळगाव, भिका लिंगा गवळी राहणार गवळीवाडा जळगाव, गणी मोहमद डिगी रा. भिलपुरा जळगाव तसेच मनपा शाळा क्रमांक 17 बळीराम पेठचे परिसरातील प्रकाश नामदेव पाटील रा बळीराम पेठ अब्दुल करीम शेख इसा राहणार काट्या फाईल जळगाव यांचे विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पो.नि. रंगनाथ धारबळे तसेच API साजिद मंसूरी, PSI योगेश ढिकले, HC युवराज कोळी, HC विजय खैरे, HC गिरीश पाटील, PN भागवत शिंदे, PC विकी इंगळे, PC 2253 पाटील PC अनिल कांबळे यांनी तसेच जळगाव महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी श्री संजय ठाकूर व त्यांचे अधिनस्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.