Attention : गणेश विसर्जन मिरवणुकीसह सणोत्सवात वाजणार ‘कार्बाइड गन’, किंमत फक्त..
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सध्या गणेशोत्सवाची धूम सुरु असून काही दिवसात बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. सध्या गावगावात १०० रुपयात एक बंदुक विक्री होत असून गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘कार्बाइड गन’ आवाज करणार अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे या बंदुकीतून होणारा आवाज खऱ्याखुऱ्या गोळीबारसारखा असून त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.
शेतात आणि जंगल परिसरात जंगली प्राणी, नील गाय, माकड, हत्ती, डुक्कर यांना दूर पळवण्यासाठी शेतकरी कार्बाइड गन वापरतात. बंदुकीचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यामुळे वन्य प्राण्यांना इजा होत नाही, परंतु त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजामुळे आणि आगीमुळे त्यांना दूर पळवणे शक्य होते. शेतकरी बांधवांसाठी कार्बाइड गन नेहमीच्या वापराचे साहित्य आहे.
कार्बाइडमुळे होतो मोठा आवाज आणि जाळ
कार्बाइड गन पीव्हीसी पाईप्सपासून तयार करण्यात आल्या आहेत. मागील बाजूला गॅस लायटर लावलेले असून त्यातून ठिणगी निर्माण होते. त्या गन कार्बाइड फ्लिंडर्स आणि पाण्याच्या मिश्रणाने वापरल्या जातात. त्यातून थोडा धूर निघतो आणि ट्रिगर दाबल्यावर बंदुकीतून गोळीबार होतो. त्यातून मोठा आवाज आणि आग निर्माण होते. हे हाताळण्यास देखील खूप सोपे आहे. विशेष म्हणजे शेतात आणि जंगल परिसरात कार्बाइड गन मदत म्हणून उपयोगात आली आहे.
अवघ्या १०० रुपयात विक्री
जळगाव जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी अवघ्या १०० रुपयात कार्बाइड गनची विक्री केली जात आहे. तसेच १० रुपयांची कार्बाइडची पुडी मिळत आहे. अवघ्या ११० रुपयात अंदाजे ३० वेळा गन फायर होत असतो. गणेश विसर्जन मिरणवुक आणि आगामी सणउत्सवाच्या काळात कार्बाइड गनचा आवाज घुमणार असे चित्र आहे.
बंदुकीचा पोलिसांच्या डोक्याला ताप
कार्बाइड गनमधून होणारा आवाज खऱ्या बंदुकीच्या आवाजासारखा आहे. त्यातून जाळ देखील निघत असल्याने गोळीबार झाल्यासारखे वाटते. आगामी काळात पोलिसांना या कार्बाइड गनमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागणार असून त्यावर वेळीच आवार घालणे आवश्यक आहे.
पहा व्हिडीओ :
video-output-43DF1CD5-066B-4776-B1EE-79129214B16D