
औरंग्याची कबर हटवा ; विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची मागणी
जळगाव प्रतिनिधी
संपूर्ण भारतभर तसेच जळगाव मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आज दिनांक 17 मार्च सोमवार रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये क्रूर मुघल औरंगजेब याची कबर हटवण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.
महाराष्ट्र ही पवित्र संतांची भूमी तसेच भारत देश हा सनातन संस्कृतीला मानणारा देश आहे या पवित्र भूमीवर अशा क्रूर मुघल औरंग्याची कबर असणे हे या देशासाठी अशोभनीय आहे.
या क्रूर औरंगजेब याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची किती क्रूरपणाने हत्या केली तसेच गुरुगोविंद सिंग यांचे बाल साहेब जादे यांची भीतीमध्ये चिरून हत्या केली तसेच गुरु तेजबहादुर सिंग यांची देखील त्याने हत्या केली.
काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले , मथुरे मध्ये असलेले सुंदर मंदिराचा विध्वंस यांनी केला. सोरटी सोमनाथ येथील मंदिर पुन्हा यानेच पाडले त्रंबकेश्वर जेजुरी अशा मंदिरांवर हल्ले केले. असंख्य हिंदूंवर धर्मांतरण करण्यासाठी हल्ले केले.
अशा या क्रूर औरंग्याची कबर या पवित्र भारत देशामध्ये असणे म्हणजे देशामध्ये गुलामीचे प्रतीक असल्याचे भासते. म्हणून या आंदोलनाद्वारे शासनाला विनंती आहे की कायदेशीर रित्या प्रशासकीय बाबीनुसार या देशातून अशा क्रूर विकृतीचा विध्वंस करावा ही कबर त्या ठिकाणाहून हटवावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल हे छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी असलेली औरंग्याची कबर या ठिकाणी कार सेवा करण्यास असंख्य हिंदू सोबत पोहोचेल आणि ती कबर उध्वस्त करेल.
अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आलेली आहे.
सदरील आंदोलनामध्ये व निवेदन सादर करताना श्री योगेश्वरी गर्गे प्रांतमंत्री , श्री शांताराम जी शिंदे विभाग मंत्री, श्री देवेंद्रजी भावसार विभाग सहमंत्री, श्री खंडुभाऊ पवार जिल्हा उपाध्यक्ष, श्री राकेश लोहार विभाग संयोजक, श्री राजेंद्र गांगुर्डे जिल्हा सह मंत्री, श्री संतोष भाऊ पाटील शिवसेना शिंदे गट , श्री जितेंद्र मराठे भाजपा, पियुष कोल्हे , निलेश आबा तायडे, मनोज बाविस्कर, सतीश गायकवाड व सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.