Other

भडगाव-चाळीसगावात अवैध वाळू उपसाचा सुळसुळाट

भडगाव-चाळीसगावात अवैध वाळू उपसाचा सुळसुळाट

प्रशासनाचे डोळेझाक धोरण? महसूल गमावून पर्यावरणाचे गंभीर नुकसान

भडगाव प्रतिनिधी – भडगाव तालुक्यातून चाळीसगाव दिशेने होणारी अवैध वाळू वाहतूक दिवसेंदिवस बळावत चालली आहे. ही केवळ शासनाच्या महसूलाचे नुकसान करणारी बाब नसून पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाचे याकडे सुरू असलेले दुर्लक्ष आणि वाळू माफियांचे खुलेआम चाललेले कारस्थान यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.

तालुक्यात कोणताही अधिकृत वाळू लिलाव न झालेला असतानाही दररोज रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर व टिप्परमधून वाळूची अवैध वाहतूक निर्भीडपणे सुरू आहे. महसूल आणि पोलीस विभागाकडून यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये ‘प्रशासन माफियांच्या बाजूने आहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामुळे महसूल बुडत असून, नद्यांच्या खोलीकरणामुळे भूजल पातळी घटत आहे. शेतजमिनींवर परिणाम होऊन शेतीला धोका निर्माण होत आहे. यासोबतच, अशा अवैध धंद्यातून येणारा पैसा स्थानिक गुन्हेगारीला पोसतो आहे.

सामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आता आवाज उठवत असून, वाळू माफियांच्या साखळीचा भंडाफोड करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली जात आहे.

क्रमशः…

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button