Politics
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. अनिल पाटील यांची प्रवक्तेपदी नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या आ. अनिल पाटील यांची प्रवक्तेपदी नियुक्ती
अमळनेर : महाराष्ट्राचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. आ. अनिल पाटील यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाला अनुभवी, संयमी, शांत स्वभावाचे आणि विकासाभिमुख नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख कार्यपद्धतीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना ही राज्यस्तरीय जबाबदारी दिली आहे. या नियुक्तीबद्दल अमळनेरसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.






