EducationSocial

गावागावात अभ्यासिका सुरू झाल्या पाहिजेत” डॉ.जयेंद्र लेकुरवाळे

जळगाव (प्रतिनिधी)गावागावात अभ्यासिका सुरू झाल्या पाहिजे,भालोद या गावातील ही बहिणाबाई अभ्यासिका विद्यापीठ क्षेत्रामध्ये एक नंबरची अभ्यासिका निर्माण झाली आहे याचा मला आनंद आहे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1952 ला या संस्थेने चालविलेल्या शाळेला भेट दिली. त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी मी आपल्या अभ्यासिकेच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, हे माझ्यासाठी गौरवाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर ग्रंथ आणि ग्रंथाशी असलेलं नातं दाखवून दिलेले आहे या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी टास्क बेस अभ्यास करणे गरजेचे आहे. मी जर दहा तास अभ्यासिके मध्ये उपस्थित आहे,असे म्हटले तर या दहा तासांपैकी मी नेमका किती वेळ अभ्यास केला हे महत्त्वाचे आहे.तसेच किती वेळ अभ्यास केला, यापेक्षा मी काय अभ्यास केला हे महत्त्वाचे आहे.पुढच्या वर्षी या अभ्यासिकेमध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक तरी विद्यार्थी अधिकारी झालेला असेल असा मला आत्मविश्वास आहे. वाचनालय संस्कृती ही टिकली पाहिजे,ती वाढली पाहिजे याकरता या भालोद गावातील ही बहिणाबाई अभ्यासिका जिवंत ठेवणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.जयंत लेकुरवाळे यांनी केले.

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील बहिणाबाई अभ्यासिकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर , निसर्ग कन्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर बहिणाबाई अभ्यासिकेचे समन्वयक प्रा. डॉ.सुनील नेवे यांनी प्रस्तावनेमध्ये अभ्यासिकेची वर्षभरा मधली कामगिरी विशद केली. अभ्यासिकेमध्ये 70 हजार रुपये मूल्य असलेली 449 पुस्तके आहेत.विविध वर्तमानपत्रे,मासिके आहेत.अभ्यासिकेतील लक्ष्मण नथू कोळी हा विद्यार्थी पोलीस भरतीची परीक्षा पास झाला.अभ्यासिकेतील विद्यार्थी अक्षय भागवत माळी आणि मोहित अरुण नेते हे विद्यार्थी गृहरक्षक दलाची परीक्षा पास झाले. तसेच या अभ्यासिकेमध्ये वर्षभरामध्ये विविध मान्यवरांनी भेटी दिल्या ,देणगीदारांनी पुस्तके दिली याचा उल्लेख केला.तसेच या अभ्यासिकेमध्ये हिंगोणा ,सांगवी, चिखली, म्हैसवाडी अट्रावल या गावातील विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये नियमित येतात अशी माहिती प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी दिली.या नंतर डॉ जयेंद्र लेकुरवाळे,प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे,उपप्राचार्य मुकेश चौधरी यांचे पुस्तक देवून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. सुनील नेवे यांनी विविध पुस्तके भेट म्हणून दिली.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय भालोद च्या वतीने काही पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. या अभ्यासिकेमध्ये जास्तीत जास्त वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी आकाश दीपक भालेराव,सचिन मुकुंदा पाटील, अनिकेत किशोर भालेराव, या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधीक रूपात प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे सर यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की,या अभ्यासिकेचा जास्तीत जास्त सदुपयोग करा. या अभ्यासिकेमधून अधिकारी म्हणून बाहेर पडा.तसेच आपले भविष्य उज्वल करा.अभ्यासकेतील विद्यार्थी मुकेश भालेराव,सागर भालेराव, प्रतीक मेघे या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक रूपात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कार्यक्रम अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे,उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी,विद्यार्थी विकास विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आशुतोष वर्डीकर,अभ्यासिकेचे समिती सदस्य डॉ. जतीन मेढे, डॉ.दिगंबर खोब्रागडे,प्रा. डॉ.मोहिनी तायडे,प्रा. राजेंद्र इंगळे,श्री तुळशीराम पाटील, डॉ. किरण चौधरी, डॉ. दिनेश पाटील,डॉ.वसंतराव पवार, डॉ. पद्माकर सावळे,प्रा. काशिनाथ पाटील, प्रा. चंद्रकांत वानखेडे,प्रा. हेमंत इंगळे,डॉ. गणेश चौधरी, डॉ.राकेश चौधरी,डॉ. मीनाक्षी वाघुळदे,प्रा. गीतांजली चौधरी, प्रा. फाल्गुनी राणे, प्रा.हेमलता कोल्हे, प्रा. शैलजा इंगळे, प्रा. कोमल सावळे ,प्रा. भावना प्रजापती,श्रीमती मोहिनी चौधरी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.दिलीप इंगळे, श्री. कल्याण चौधरी,श्री. किशोर चौधरी,श्री.तुळशीराम पाटील, श्री.बाळकृष्ण चौधरी, श्री. पंकज नेहते, श्री. मुबारक तडवी, श्री. रूपम बेंडाळे, श्री. चंद्रकांत लोखंडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सूत्र संचालन विद्यार्थी अतिकेश माळी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.मोहिनी तायडे यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button