थरारक चोरी : ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून सहा किलो चांदी व रोकड लंपास
शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी – पोलिसांच्या गस्तीलाही आव्हान

थरारक चोरी : ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून सहा किलो चांदी व रोकड लंपास
शहराच्या मध्यवर्ती भागात धाडसी चोरी – पोलिसांच्या गस्तीलाही आव्हान
भडगाव – प्रतिनिधी
भडगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या नामांकित घोडके ज्वेलर्स दुकानाच्या मागील भिंत फोडून चोरट्यांनी तब्बल सहा किलो चांदी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बंद असलेल्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डोळा ठेवत ही चोरी केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मालक बाहेर, चोरट्यांची संधी साधून कारनामा
मिळालेल्या माहितीनुसार, घोडके सराफ दुकानाचे मालक बाहेरगावी गेल्यामुळे दुकान बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात चांदी व रोकड लंपास केली. चोरीची माहिती आज सकाळी उघडकीस आली.
पोलिसांचा धाक उरला नाही?
शहराच्या मध्यवर्ती भागातच धाडसी चोरी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदी पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा, वाढती चोरी आणि पोलिसांची निष्क्रियता यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता भडगाव पोलिसांसमोर चोरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान आहे.
या घटनेने शहरातील व्यापारी आणि नागरिक अस्वस्थ झाले असून पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.