Crime

पोलिसांशी हुज्जतबाजी करत शांततेचा भंग करणाऱ्या तिघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

पोलिसांशी हुज्जतबाजी करत शांततेचा भंग करणाऱ्या तिघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भडगाव-प्रतिनिधी

भडगाव शहरातील पाचोरा चौफुली जवळ सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणाऱ्या तिघांना पोलिसांनी विचारणा केली असता त्या तिघांनी पाचोरा चौफुली जवळ व पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची हुज्जतबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी-पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर नाना पाटील, वय ४५,धंदा नोकरी, नेमणूक भडगांव पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी १) राजेंद्र रमेश खैरे (वय-३६),२) विक्की रमेश सोनवणे (वय-२८), ३) प्रतिक मार्तंड सोनवणे (वय-१९), तिन्ही रा. यशवंत नगर भडगांव, ता.भडगाव यांनी संगणमताने फिर्यादी व साक्षीदार पो.हे.काँ.विजय जाधव व पो.ना.मंगलसिंग गायकवाड असे तिन्ही त्यांचे शासकिय कर्तव्य पार पाडीत असतांना वरील तिन्ही आरोपी यांना विचारपुस करत असतांना पोलीस ठाणे अंमलदार ज्ञानेश्वर पाटील हे गणवेशात असतांना आरोपी क्र. १ याने फिर्यादी यांच्या गणवेशाच्या शर्टाची कॉलर पकडुन कानशीलात चापट मारली तेव्हा साक्षीदार पो.हे.काँ. विजय जाधव व पो.ना. मंगलसिंग गायकवाड यांनी आरोपी क्र. १ यास अडविले असता आरोपी क्र.२ व ३ यांनी अश्लील शिवीगाळ करत आमचे काहीएक वाकडे करु शकत नाही अशी धमकी देऊन धक्काबुक्की केली.पोलीस ठाणे अंमलदार/बारनिशी कक्षातील बारनिशी यांची शासकीय खुर्ची यास जोरात उचलुन आपटुन तिस तोडुन नुकसान करुन शासकिय कामात अडथळा आणुन सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग केली म्हणून
आरोपी १) राजेंद्र रमेश खैरे (वय-३६),२) विक्की रमेश सोनवणे (वय-२८), ३) प्रतिक मार्तंड सोनवणे (वय-१९), तिन्ही रा. यशवंत नगर भडगांव या तिघांविरुद्ध
भडगांव पोलीस स्टेशनला गु.र.न. २४२/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम १३२,१२१(१),२९६,११५(२),३५१(२),३(५),सह कलम मुंबई प्रोव्हीबीशन कायदा कलम ८५(१)सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०,११२,११७सह सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button