भडगावातील मोकाट जनावरांचा वाली कोण?

भडगावातील मोकाट जनावरांचा वाली कोण?
नागरिक,विद्यार्थ्याना व वाहतुकीला अडथळा कुचकामी यंत्रणा
नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
भडगाव प्रतिनिधी
भडगाव शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा अवधूस वाढला असून याबाबत गल्लीबोळांमध्ये आबाला वृद्ध नागरिक व विद्यार्थी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याबाबत मोकाट जनावरे हे विद्यार्थ्यांच्या किंवा आबालवृद्धांवर केव्हा हल्ला करतील हे सांगता येत नाही. याबाबत भडगाव नगरपालिकेला अनेकदा निवेदन देऊन सुद्धा यावर कुठलाही ठोस उपाय झालेला नाही. तरी भडगाव शहरातील या मोकाट जनावरांचा वाली कोण असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
मोकाट जनावरांमुळे मेन रोड वरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सोबतच शहरातील मुख्य मार्गावरही अशीच परिस्थिती असल्याने वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. या मार्गावर गतकाळात अनेक अपघातांची नोंद आहे. यात काही अपघात मोकाट जनांवरामुळे झाले आहेत. मोकाट जनावरांना पकडणे, त्यांच्या मालकांचा शोध घेण्याची मोहीम संबंधित विभागाने हाती घेतलेली नाही. यामुळे मोकाट जनावरांचा वाली कोण? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. मोकाट जनावरांसाठी केंद्र व राज्याने केलेला कायदा आणि त्याकरिता सज्ज ठेवलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे संबंधित विभाग कायद्याची अंमलबजावणी करेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. शहरात तसेच महामार्गावर ठिकठिकाणी जनावरांचे साम्राज्य बघायला मिळत असून त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. मोकाट जनावरे रस्त्यावर आडवे आल्याने अनेकदा अपघात झाले आहेत.
मोकाट जनावरांमुळे एखादा मोठा अपघात होऊन एखाद्याचा बळी जाईल तेव्हाच प्रशासनाला जाग येईल का? असा प्रश्न आता भडगावकर विचारू लागले आहेत.
मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल करणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्याची कुठलीही व्यवस्था नसल्याने स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले आहेत. हा प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे