Other
भडगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बी. आर. पाटील

भडगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बी. आर. पाटील
भडगाव -प्रतिनिधी भडगाव तालुका वकील संघाची सण 2026- 27 या वर्षाकरिता दि. 31 रोजी प्रथम निवडणूक पार पडली. भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड. बी. आर. पाटील यांनी सालाबादाप्रमाणे होणारी निवडणूक प्रक्रिया ऍड बी. आर. पाटील यांनी मोडीत काढली व इतिहास घडवला सलग दुसऱ्या वेळा अध्यक्षपदाचा बहुमान मिळवणारे भडगाव वकील संघातून ते प्रथमच वकील ठरले. यावेळी कार्यकारणीत उपाध्यक्षपदी एड. गणेश आर. वेलसे तर सचिवपदी एड. प्रकाश जी. सोनवणे यांची निवड झाली. मतदानाच्या दिवशी सर्व वकील सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.






