PoliticsSocial

भडगाव येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यालयांना प्रतिमा भेट देत विनम्र अभिवादन

भडगाव येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यालयांना प्रतिमा भेट देत विनम्र अभिवादन

भडगाव-प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भडगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रम राबवून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून शहरातील विविध प्रमुख शासकीय कार्यालयांना अजित पवार यांची प्रतिमा भेट देण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भडगाव नगरपरिषद, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन अजितदादा पवार यांची प्रतिमा सस्नेह भेट दिली. याप्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी या प्रतिमा स्वीकारल्या. या उपक्रमाद्वारे अजितदादांच्या लोकहितकारी कार्याचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील,
ओबीसी शहराध्यक्ष योगेश महाजन, शहराध्यक्ष रवींद्र महाजन, शहर कार्यकारी अध्यक्ष रमेश शिरसाठ यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button