भडगाव नगरपालिका निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा ओघ कायम, वाचा कुणासमोर कोण?
नगराध्यक्ष पदासाठी ५ तर नगरसेवक पदासाठी १३५ नामनिर्देश पत्र दाखल

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव नगरपालिका निवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज सादर करण्याचा उत्साह अधिक दिसला नगराध्यक्ष पदांसह नगरसेवक पदांसाठी आज मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चांगल्याच हालचाली पहावयास मिळाल्या.
काल नगराध्यक्ष पदासाठी रेखाबाई प्रदीप मालचे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत व लताबाई मालचे (अपक्ष), सुशिलाबाई शांताराम पाटील (भाजपा), पक्षाकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यांनीच एक अपक्ष दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्याकडून तडवी सपना नाजीम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्ष पदासाठी ५ नामांकन दाखल झालेले आहे. नगरसेवक पदासाठी आज तब्बल ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एकूण १३५ अर्ज दाखल झाल्याने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.
भडगाव पालिकेत महायुतीतील तीनही घटक पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांची अधिकृत A आणि B फॉर्म जोडून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी अर्ज दाखल केले. सदर उमेदवारी नामांकनांची संख्या पाहता राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा शहरात रंगू लागली उद्याच्या छाननीनंतर पुढील माघारीपर्यंत निवडणूक अधिक चुरशीची पहावयास मिळणार आहे.
राज्यातील सत्ताकरणातील तीनही घटक पक्ष भडगाव पालिकेत पक्षाच्या अधिकृत चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी तीनही पक्षांनी आपापले उमेदवार A आणि B फॉर्म सहित उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तिरंगी लढत भडगाव नगरपालिकेत पाहावयास मिळणार आहे.








