Social

भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांचा शासकीय कारभार सांभाळण्यात चांगला दबदबा

भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांचा शासकीय कारभार सांभाळण्यात चांगला दबदबा

अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी चांगली यंञणा हाताळल्याने सर्वस्वी श्रेय त्यांचेच

९० वाहनांवर कार्यवाहीचा बडगा उगारत नाशिक विभागात भडगाव महसुल अव्वल स्थानी

महिला दिन विशेष

भडगाव – विजय माळी

राजकारण क्षेञात, सामाजीक क्षेञात, शैक्षणिक क्षेञात , व्यावसायीक क्षेञात वा नोकरी क्षेञातही हम भी कुछ कम नही याप्रमाणे पुरुषांप्रमाणेच महिलाही चांगले कार्य पार पाडीत आहेत. अनेक महिला विविध पदांवर कार्यरत असुन चांगला कारभार चालवितांना दिसतात. असेच उदाहरण भडगाव येथील महिला तहसिलदार शितल वैभव सोलाट यांच्या चांगल्या कार्याबाबत दिसुन आले आहे. त्यांचे
शिक्षण बीएससी बायोटेक, एमबीए असे झाले आहे. त्यांची
२०१४ मध्ये मंत्रालय सहायक पदावर निवड झाली. त्यानंतर त्यांची
२०१४ मध्ये विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली. तर
२०१५ मध्ये त्यांची तहसिलदार पदावर निवड झाली आहे. यापुर्वी बजावलेली सेवा अशी आहे.
मंत्रालय मुंबई, सातारा, वाशीम, बुलढाणा अशी सेवा बजावली आहे.
त्यांची भडगावी तहसिलदार म्हणुन ९ सप्टेंबर २०२४ मध्ये नियुक्ती झाली आहे. त्या महिला तहसिलदार पदावर कामकाज सांभाळत त्यांनी विधानसभा निवडणुकीतही चांगली यंञणा राबविल्याचे दिसुन आले. एवढेच नव्हे तर महसुल विभागातही त्यांचे काम अव्वलच राहील्याचे दिसुन येत आहे. कमी कार्यकाळात त्यांनी अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी चांगली यंञणा हाताळल्याचे दिसत आहे. आतापर्यंत त्यांनी अवैधरित्या गौण खनिज वाहतुक करणार्या ९० वाहनांवर कार्यवाहीचा बडगा उगारत दंडात्मक वसुलीच्या कार्यवाहीतुन शासनाला चांगला महसुल मिळवुन दिला आहे. जनतेचे छोटे मोठे प्रश्न सोडविण्यासाठी त्या अग्रेसर आहेत. महिला तहसिलदार असुनही गिरणा नदीच्या पाञातुन होणार्या वाळुरुपी वस्ञहरण रोखण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासुन वज्रमुठ बांधली असुन कार्यवाहींची मालीका कायम सुरुच आहे. गिरणा माईचे वस्ञहरण रोखण्यासाठी अवैध गौण खनिज वाहतुक व वाळु चोरी रोखण्यासाठी कार्यवाहीचा बडगा सुरुच राहील. असे त्यांनी सुरुवातीपासुनच जाहीर केलेले आहे. परंतु कार्यवाहींचे सञही सुरुच ठेवल्याचे दिसत आहे. अशा महिला तहसिलदार शितल सोलाट यांचा भडगाव तालुक्यात शासकीय कारभार सांभाळण्यात चांगला दबदबा असल्याचे दिसत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button