Politics

भीम आर्मी, आदिवासी टायगर सेना करणार करण पाटलांचा प्रचार

जळगावात दिला जाहीर पाठिंबा

महा पोलीस न्यूज | २ मे २०२४ | महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पाटील यांना भीम आर्मी आणि आदिवासी टायगर सेना या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही संघटनांच्या पाठिंब्यामुळे करण पाटील यांची ताकद वाढली आहे.

शहरातील तांबापुरा येथे मंगळवार दि. १ रोजी झालेल्या सभेत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला तर आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील मोरे यांनी देखील करण पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी नानाभाऊ महाजन, दशरथ महाजन, जगदीश पाटील, रमेश महाजन, प्रमोद महाजन, आर. डी. पाटील, राजेंद्र शिंदे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button