स्मिता वेद यांची भाजप जळगाव महानगर जिल्हा गुजरात समाज महिला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती

स्मिता वेद यांची भाजप जळगाव महानगर जिल्हा गुजरात समाज महिला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीने स्मिता उमेशचंद्र वेद यांना जळगाव महानगर जिल्हा गुजराथी समाज महिला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केले आहे. ही नियुक्ती केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.यावेळी आमदार राजूमामा भोळे , दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
स्मिता वेद यांनी भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, पक्षाने त्यांचा अनुभव आणि संघटनात्मक काम पाहता ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या मूल्याधारित राजकारण, संघ भावना आणि सहकार्य यांच्या मार्गदर्शनाखाली, आगामी काळातही सौ. वेद सक्रिय राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पक्षाने सौ.स्मिता वेद यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






