Crime

मोठी बातमी : जळगाव एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची बदली

महा पोलीस न्यूज । दि.७ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ झालेले अवैध गॅस भरणा स्फोट प्रकरण एमआयडीसी पोलीस स्टेशन निरीक्षकांना चांगलेच भोवले आहे. दुर्घटनेत ७ लोकांचे बळी गेल्यावर आणि सर्वत्र टीका होत असल्याने पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी बदलीचे आदेश जारी केले आहेत. इच्छादेवी चौकाजवळ महामार्गलगत अवैध गॅस भरणा करताना स्फोट झाला होता. घटनेत ७ लोकांना जीव गमवावा लागला होता. घटनेनंतर तत्काळ २ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. दरम्यान, घटनेची व्याप्ती आणि होत असलेली टीका लक्षात घेता पोलीस अधिक्षकांनी निवडणूक आटोपताच मोठा निर्णय घेतला आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांची शनिवारी जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. सध्या दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार स्वीकारण्यात आला असून लवकरच नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी महा पोलीस न्यूजला सांगितले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button