भाजप युवा मोर्चा भडगाव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

भाजप युवा मोर्चा भडगाव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर
चेतन पाटील मंडलाध्यक्ष, योगेश शेलार शहराध्यक्ष; तरुणांना संघटित करण्यावर भर
भडगाव | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष जळगाव पश्चिम जिल्ह्यांतर्गत भडगाव मंडळाच्या युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचा जनाधार वाढविणे, तरुणांना संघटित करणे आणि संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली. युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराव महाडीक, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि युवामोर्चा जिल्हाध्यक्ष वीरेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव तालुका अध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेने मंडलाध्यक्ष चेतन रंगनाथ पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड
नवीन कार्यकारिणीत चेतन रंगनाथ पाटील यांची मंडलाध्यक्ष, तर योगेश शांताराम शेलार यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष आणि सोशल मीडिया प्रमुखांसह विविध पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच २३ सदस्यीय कार्यकारिणीत विविध गावांतील सक्रिय युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
नवीन कार्यकारिणीचे माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, प्रतापराव हरी पाटील, संजय वाघ, सोमनाथ पाटील, प्रशांत पवार, अनिल वाघ, सचिन चोरडिया, जितेंद्र पाटील, रवींद्र सोनवणे, प्रदीप सोमवंशी, किरण शिंपी, योगेश पाटील आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.






