आमदार सुरेश दामू भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

आमदार सुरेश दामू भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
जळगाव (प्रतिनिधी) – आमदार सुरेश दामू भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्र. १ व भारतीय जनता पक्ष जळगाव महानगरतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम आज, शुक्रवार दिनांक १३ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता वसंत स्मृती, भाजपा कार्यालय, बळीराम पेठ येथे पार पडला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यावेळी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, राजू मराठे, आनंद सपकाळे, रेखा वर्मा, भारती सोनवणे, संजय शिंदे, जयेश भावसार, सागर पाटील, मिलिंद चौधरी, अरुण श्रीखंडे, विठ्ठल पाटील, सागर जाधव, राहुल घोरपडे, राहुल पाटील, स्वप्नील चौधरी, दिलीप नाझरकर, सोहम खडके, अर्जुन भारुडे, उमेश देशपांडे, मयूर बारी, भरत कर्डिले, निलेश तायडे, गीता नागला, जयवंत चव्हाण, बंटी भारंबे, निश्चल साळुंखे, दीपक कोळी, योगेश पाटील, ज्ञानेश्वर अडसूळ, संगीता पाटील, तारा पटेल, नयना दुसाने, प्रल्हाद सोनवणे, सुनील जाधव, प्रमोद वाणी, तुषार सूर्यवंशी, दीपक सुरळकर, जहागीर खान, वसीम शेख, रावण ठाकरे, अशोक घाडगे, हर्षल शिखवाल, शुभम विंचवेकर, प्रशांत सावंत, स्वप्नील साखळीकर, दीपक झुंजारराव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.