Social

गुरुपौर्णिमा निमित्त पोलीस दलातर्फे शिक्षकांचा सन्मान

अमळनेर पोलीस दलाकडून गुरुपौर्णिमा साजरी

अमळनेर | (पंकज शेटे) – अनुभव हा आपल्या आयुष्यातील मोठा गुरू असतो. जीवनात अनेक चुकीच्या गोष्टींना विनाकारण सामोरे जावे लागते मात्र त्याला सकारात्मक घ्या , सकारात्मक दृष्टिकोन माणसाला आयुष्यात यशस्वी ठरवतो असे प्रतिपादन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विनायक कोते यांनी पोलिसांतर्फे आयोजित *‛गुरूंचा सन्मान’* या कार्यक्रमात केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त अमळनेर येथील इंदिराभुवन मध्ये मा. पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या संकल्पनेतून, मा. पोलीस अधीक्षक सो जळगाव व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाने तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो अमळनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तालुक्यातील प्राथमिक , माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचा सन्मान आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.विनायक कोते सो. होते. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले की शिक्षक हा समाज घडवणारा घटक आहे. चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देणारा दुवा आहे. शिक्षक आहेत म्हणून जग टिकून आहे म्हणून त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुरूंचा सन्मान हा एक प्रयत्न आहे.

नमूद कार्यक्रम प्रसंगी मागील काळात आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व दिव्यांग शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी विस्तार अधिकारी प्रमोद पाटील , मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरसे , प्रमोदिनी पाटील, प्रा शिला पाटील , अर्बन बँकेचे व्हॉ चेअरमन रणजीत शिंदे ,केंद्रप्रमुख शरद सोनवणे , स्वाती पाटील , छगन पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रातिनिधिक स्वरूपात गोकुळ साळुंखे , इंदूबाई महाले मंगरूळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील , साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे , लायन्स क्लबचे सचिव महेंद्र पाटील यांचा सत्कार व्यासपीठावर करण्यात आला त्यांनतर उपस्थित सर्व शिक्षकांचा जागेवर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मारवड पोलीस स्टेशनचे एपीआय जीभाऊ पाटील , एपीआय रवींद्र पिंगळे , एपीआय सुनील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, फिरोज बागवान, गणेश पाटील, अशोक साळुंखे, चंद्रकांत पाटील, विनोद भोई, मिलिंद सोनार, लक्ष्मीकांत शिंपी, अमोल पाटील, सिद्धांत शिसोदे, प्रशांत पाटील , जितेंद्र निकुंभे, नितीन कापडणे, शेखर साळुंखे हजर होते. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी तर आभार सिद्धांत शिसोदे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button