Social

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन; २००० रुग्णांची तपासणी, ३०५ रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियांचे आश्वासन – ना. गिरीश महाजन यांची घोषणा जळगाव (प्रतिनिधी) :

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन; २००० रुग्णांची तपासणी, ३०५ रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियांचे आश्वासन – ना. गिरीश महाजन यांची घोषणा

जळगाव (प्रतिनिधी) :
प्रख्यात कथाकार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष जळगाव व जी.एम. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केमिस्ट भवन येथे भव्य महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, पंडित प्रदीप मिश्रा यांनी स्वत: व्हिडिओ कॉलद्वारे आयोजकांचे अभिनंदन करत शिबिराचे मन:पूर्वक कौतुक केले.

या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉ. किरण पाटील (सिव्हिल सर्जन) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुमित जैन, डॉ. परागजी, डॉ. वाडीले मॅडम, डॉ. महाजन आदी मान्यवर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. शिबिरात तब्बल २००० रुग्णांनी लाभ घेतला असून, तपासणी दरम्यान ३०५ रुग्णांना तातडीने शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

या सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदामंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

आरोग्य शिबिराच्या आयोजनात खानदेश केटरिंग असोसिएशन व विठ्ठलेश्वर सेवा समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सहभागी असलेली सर्व खाजगी रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी महाविद्यालयांनीही यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी जी.एम. फाउंडेशनचे पितांबर भावसार, दिवे जाधव, संतोष पवार, शिवाजी पाटील तसेच खानदेश केटरिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पितांबर भावसार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रतन सारस्वत यांनी केले.

या महाशिबिराच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे उत्तम उदाहरण समोर ठेवत, समाजहितासाठी कार्यरत असलेल्या सर्व घटकांचे अभिनंदन होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button