ब्रेकिंग : ५ हजारांची लाच भोवली, मंडळ अधिकारी रंगेहात
महा पोलीस न्यूज | ६ जून २०२४ | सात बारा उताऱ्यावर वडीलांसह आते भावाचे नाव कमी करुन आईचे नाव लावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारणा-या मंडळ अधिकाऱ्याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण खंडू बाविस्कर नेमणूक सजा पिंप्राळा असे लाचखोर मंडळ अधिका-याचे नाव आहे.
जळगावातील तक्रारदाराने सात बारा उताऱ्यावर वडीलांसह आते भावाचे नाव कमी करुन आईचे नाव लावण्यासाठी पिंप्राळा सजा येथे अर्ज केला होता. मंडळ अधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी त्याला सुरुवातीला दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एसीबी पथकाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने तक्रार दिल्यावर सापळा कारवाईत पाच हजार रुपयांची लाच स्विकारतांना मंडळ अधिकारी किरण बाविस्कर यास रंगेहाथ पकडण्यात आले.
पथकाने केली कारवाई
याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा तपास अधिकारी तथा पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पोकॉ.राकेश दुसाने तसेच कारवाई मदत पथकातील पो.नि.एन.एन.जाधव, पी.एस.आय.सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर, पोना.किशोर महाजन, पोना.सुनिल वानखेडे, पोकॉ.प्रदीप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोकॉ.अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.