Crime

ब्रेकिंग : जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी, १ कैदी जखमी

महा पोलीस न्यूज । दि.३० ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्हा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारागृहातील बंदीवान कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. कारागृहात झालेल्या वादात एक बंदीवान कैदी जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सचिन सोमनाथ गायकवाड (वय ३० रा.चाळीसगाव) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव उपजिल्हा कारागृहात शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कॅन्टीनचा सामान देण्याघेण्यावरून बॅरिकेट क्रमांक १ ते ४ आणि ९ ते १२ मध्ये असलेल्या बंदीवान कैद्यांमध्ये वाद झाला. सुरूवातीला शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद वाढल्याने कैद्यांच्या दोन गटातून हाणामारी होवून दगडफेक करण्यात आली. कारागृहात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे दगड कैद्यांनी वापरले. या दगडफेकीत सचिन सोमनाथ गायकवाड (वय ३० रा.चाळीसगाव) या तरूणाच्या डोक्याला दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

घटना घडल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्यासह पोलीस मुख्यालयातील क्यूआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी कैद्याला तातडीने रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. जिल्हा कारागृहात नेहमीच काही ना काही होत असून अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button