Crime

ब्रेकिंग : हळदीच्या कार्यक्रमात बंदुकीची दहशत, नागरिकांनी चोपले, पोलिसांनी पकडले

महा पोलीस न्यूज । दि.२४ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात राजाराम हॉल हळदीच्या कार्यक्रमात बंदूक घेऊन दहशत माजवणाऱ्याला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. शहर पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक दि.२२ डिसेंबर रोजी रात्री गस्तीवर असताना इंद्रप्रस्थ नगरात राजाराम नगर मंगल कार्यालय बाहेर वाद सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उमेश भांडारकर आणि वसीम मलिक हे त्याठिकाणी पोहचले असता गर्दीत मारहाण होत असलेल्या तरुणाला त्यांनी सोडवले. पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता अतुल बजरंग तांबे वय-३१ रा.राजगुरू नगर, जि.पुणे असे त्याने सांगितले. त्याच्यासोबत आणखी २ व्यक्ती असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

पथकाने कट्ट्यासह घेतले ताब्यात
शहर पोलिसांनी घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळविले. शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, सहायक उपनिरीक्षक सुनील पाटील, हवालदार किशोर निकुंभ, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे यांनी धाव घेतली. अतुल तांबे यांनी याच्याकडे असलेल्या बॅगेतून गावठी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. पळून गेलेल्या एकाचे नाव माया तर दुसऱ्याचे माहिती नसल्याचे त्याने सांगितले.

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
हवालदार उमेश भांडारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अतुल तांबे, माया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button