Crime

ब्रेकिंग : शासकीय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर देहविक्री व्यवसाय!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात अनेक ठिकाणी देहविक्री व्यवसाय केला जातो. पोलीस कारवाई देखील करतात मात्र ते व्यवसाय सुरूच असतात. जळगाव शहरातील मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषद आणि शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ देहविक्री करणाऱ्या महिलांचा कट्टा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील आणि शहरात अनेकदा पोलीस देह विक्री सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाई करून महिलांची सुटका करतात. पोलीस कारवाईत अनेकांना अटक करून गुन्हे देखील दाखल होतात मात्र नंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर एकच हॉटेलवर ३ वेळा कारवाई करण्यात आली मात्र तरीही काही विशेष फरक पडलेला नाही. पोलिसांच्या आशिर्वादाने शहरात काही ठिकाणी हा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जाते.

नागरिकांना त्रास, महिलांची कुचंबना
गेल्या अनेक महिन्यांपासून देहविक्री करणाऱ्या काही महिला शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली उभे राहून ग्राहक शोधत होत्या. बऱ्याचदा त्याठिकाणी असलेल्या बाकांवर त्या बसून असल्याने त्यानंतर तिथे कुणी इतर महिला येऊन बसल्या तर ग्राहक त्यांच्याकडे त्याच नजरेने बघत असतात. जिल्हा परिषद कर्मचारी किंवा कामनिमित्त त्याठिकाणी येणाऱ्या महिलांची त्यामुळे मोठी कुचंबना होत असते.

बाक हटवले, जागा बदलली
शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली जुन्या जिल्हा परिषद इमारतीच्या समोर असलेले सर्व बाक गेल्या आठवड्यात मनपाने हटवले होते. बाक हटवल्यानंतर देहविक्री करणाऱ्या महिलांनी आपला कट्टा देखील दुसरीकडे वळवला. सध्या जनता सहकारी बँकेच्या गल्लीत कोपऱ्यावर ३-४ महिला बसून असतात. शहर पोलीस ठाणे तिथून हाकेच्या अंतरावर आहे.

कारवाईची नागरिकांना प्रतिक्षा
देह विक्री करणाऱ्या महिला ग्राहक शोधून जवळच असलेल्या एखाद्या लॉजचा आसरा घेतात. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून शहर पोलीस आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाई कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button