ब्रेकिंग : अबब.. शनिपेठ पोलिसांनी पकडले ६१ गॅस सिलेंडर, अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा

महा पोलीस न्यूज । दि.१७ जून २०२५ । जळगाव जिल्ह्यातील शनिपेठ पोलिसांनी मोहन टॉकीज परिसरातील असोदा रोडवरील पिवळ्या भिंती भागातील एका घरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकून ६१ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. या कारवाईमुळे अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सिलिंडरमध्ये २८ व्यावसायिक सिलिंडर (१० भरलेले, १८ रिकामे) आणि ३३ घरगुती सिलिंडर (१३ भरलेले, १० रिकामे) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी वाहन चालक आदेश राजू पाटील, राहुल नारायण सोनवणे आणि राकेश नारायण सोनवणे यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे, कमलेश पाटील, गजानन वाघ, योगेश साबळे, अमोल वंजारी, निलेश घुगे, विक्की इंगळे, नवजीत चौधरी, पराग दुसाने यांनी ही धडक कारवाई केली.
या अवैध गॅस भरणा केंद्रामुळे परिसरातील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.
पहा संपूर्ण व्हिडिओ :