Other

हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

महा पोलीस न्यूज । दि.१२ जून २०२५ । शहरातील सम्राट कॉलनी परिसरात गुरुवारी, १२ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तलवार हातात घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या २२ वर्षीय धीरज दत्ता हिवराळे या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत अटक केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला तलवारसह ताब्यात घेतले. धीरज हिवराळे याच्यावर यापूर्वीही दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.या घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पो. उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. प्रविण भालेराव, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे व रविंद्र कापडणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button