Crime

दुचाकीस्वाराचा अमळनेर मंगरूळ जवळ अपघात

अमळनेर (पंकज शेटे) -चाळीसगाव तालुक्यातील भामरे गावचे संतोष चिंतामण चंदासरे (वय 60) हे कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते. ते आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच 19 बी एच 4230 वरुन परत जात असताना मंगरुळ च्या वृंदावन हॉटेलच्या पुढे 100 मीटर अंतरावर मोटरसायकल पडून जबर जखमी झाल्याची घटना घडली. संतोष चंदासरे यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. ते सुमारे अर्धा तास पडलेले होते. हॉटेल मालक किरण पाटील, चेतन पाटील, युवराज सोनवणे, गणू पाटील यांनी त्यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, काशिनाथ पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळावर एक पीक अप व्हॅन बंद अवस्थेत दिसून आली. मात्र वाहनाला धडक लागल्याचे काहीच दिसून आले नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button