मॉर्निंग वॉकदरम्यान दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

मॉर्निंग वॉकदरम्यान दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
जळगाव: मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या एकाच दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून चोरल्या. ही घटना १ मे रोजी सकाळी घडली असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत
.प्रेमनगर परिसरातील मंदिराजवळ पूजा मनोज चांडक (वय ४२, रा. प्रेमनगर) या मॉर्निंग वॉक करत असताना एक चोरटा चालत आला आणि त्याने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्यानंतर तो दुचाकीवर बसून पसार झाला.
त्याचवेळी, फॉरेस्ट कॉलनीजवळ संगीता राजेश कडे (वय ५२, रा. बहिणाबाई बगीचाजवळ) यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळीही असाच प्रकार करून चोरट्यांनी लांबवली.
पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत असले तरी दुचाकीचा क्रमांक अस्पष्ट आहे. पोलिस तपास करत आहेत.