दुर्दैवी : विजेचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील ५ ठार, चिमुकला बचावला

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात विजेच्या धक्क्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेत दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे. घटनेत एक चिमुकला बचावला असून घटनास्थळी पोहचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विजेच्या खांबात शॉर्टसर्किटमुळे वीजप्रवाह उतरला होता. याची कल्पना नसल्याने एका महिलेला विजेचा जोरदार धक्का बसला. तिला वाचवण्यासाठी गेलेले इतर चार जणही या प्रवाहाच्या संपर्कात आले. दुर्दैवाने या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचा देखील समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून नेमके कारण काय यांचा शोध सुरू आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :
https://youtu.be/6bf-_OaLTQA






