क्रूझरच्या धडकेत महिला जागीच ठार ; चाळीसगावच्या रांजणगाव फाट्यावरील घटना

क्रूझरच्या धडकेत महिला जागीच ठार ; चाळीसगावच्या रांजणगाव फाट्यावरील घटना
चाळीसगाव I प्रतिनिधी
कूझर ने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार तर ६ जण जखमी झाल्याची घटना चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर महामार्ग क्रमांक २११ वर १९ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. चंदाबाई मलखान पवार (रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील खेडें तांडा येथील कृष्णासंजय जाधव (वय १९) हा दुचाकी (एमएच १९, एएस ८४७३) वर त्याची आजी चंदाबाई मलखान पवार यांना घेवून चाळीसगाव कडे येत होता. तर रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कुझर (एमएच- २०, सीएच- ६५२२) या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई मलखान पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ जानेवारीला दुपारी १.३० ते २ वाजेदरम्यान घडली. तर दुचाकी चालक कृष्णा संजय जाधव यासह कुझरमधील चालक व प्रवासी असे ५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात चारचाकी वाहन रस्त्यावरच उलटले होते. दरम्यान, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.