वक्फ विधेयकावरून गदारोळ ; १० खासदारांना केले समितीमधून निलंबित
खासदारांमध्ये शिवसेना (ठाकरे) अरविंद सावंत, असुदद्दीन ओवेसी यांचा समावेश

वक्फ विधेयकावरून गदारोळ ; १० खासदारांना केले समितीमधून निलंबित
खासदारांमध्ये शिवसेना (ठाकरे) अरविंद सावंत, असुदद्दीन ओवेसी यांचा समावेश
नवी दिली I वृत्तसंस्था
वक्फ दुरुस्ती विधेयकाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत जोरदार गदारोळ झाला. या बैठकीदरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह विरोधी पक्षांच्या १० खासदारांचे निलंबन करण्यात आले.
शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. काही वेळातच सभेत गदारोळ सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून १० खासदारांचे समितीच्या सदस्यत्वावरून निलंबन करण्यात आले. बैठक २७ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली.
निलंबित विरोधी खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मो. जावैद, ए राजा, असदुद्दीन ओवेसी, नासिर हुसेन, मोहिबुल्ला, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे.