राष्ट्रीय जनमंच पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

राष्ट्रीय जनमंच पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
अरुण सपकाळे जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग), सुरेश कोहली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
जळगाव : जळगाव येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय जनमंच पक्षाची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
बैठकीत अरुण हरी सपकाळे यांची जळगाव जिल्हाध्यक्ष (उत्तर विभाग)पदी तर सुरेश कोहली यांची जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे विचार आणि धोरणे घराघरात पोहोचवून संघटनात्मक बळकटी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. जिल्ह्यात गावोगावी शाखा सुरू करून पक्षाचा विस्तार करावा, अशी सूचना प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी यावेळी केली.
या बैठकीस प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश संघटक देविदास वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष (पश्चिम विभाग) देविदास हटकर, जिल्हा सचिव अमृत निंबा सैंदाणे, चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस, चोपडा तालुका अध्यक्ष सुरेश सोनावणे, जळगाव शहर अध्यक्ष प्रमोद डोंगरे तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार चाळीसगाव तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी मानले.






