हुश्य… अखेर तिढा सुटला.. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज होणार घोषणा-सूत्र
मुंबई नवी दिल्ली वृत्तसंस्था:-गेल्या पाच दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार आणि किती उपमुख्यमंत्री असणार शपथविधी आणि मंत्रिमंडळ केव्हा स्थापन होणार अशी विविध प्रश्न राजकीय पक्षांसह सर्वसामान्य जनतेला पडलेले असताना गुरुवारी रात्री उशिरापर्यंत केंद्रीय मंत्री आणि चहा यांच्या निवासस्थानी या प्रश्नांवर चर्चा होऊन मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह विविध महत्त्वाचे खाते देखील देण्याचे या बैठकीत ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला असून आज राज्यात महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या नावासह मंत्री मंडळाची यादी आणि शपथविधी कुठे कधी होणार याबाबत चर्चा होऊन निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.