चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती विकासाच्या वाटेवर : ३९.७१ लाखांचे काँक्रिटच्या कामाचे भूमिपूजन

चोपडा! मिलिंद वाणी –
चोपड़ा कृषि उत्पन्न त्पन्न बाजार समितीत गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी, व्यापारी, हमाल यांच्यासाठी अनेक कामे करण्यात आली. अंतर्गत ३९.७१ लाखांचे ट्रिमिक्स कामाचे भूमिपुजन करण्यात आले. यामुळे सर्व घटकांना या विकासकामांचा फायदा होईल.
२८ रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार चोपडा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता चद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख आतीथी जिल्हा बँक संचालक घनशाम आग्रवाल, जिल्हा दूध संघाचे सचालक रोहीत निकम होते. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे शेतकरी बांधवांसाठी बाजार समितीचे सभापती व सचालक यांना सुचना दिल्या शेतकरी हिताकरता जे. सी. बी. घेण्यास सांगितले. तसेच काही नवीन प्रोजेक्टसाठी पणन मंत्र्यांशी बैठक घेऊन काही नवीन योजना आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी रोहितदादा निकम यानीही मनोगत व्यक्त केले. शेतकरी हितासाठी एक महत्त्वाचे पाऊल –
मुख्य मार्केट यार्डमधील गोडाऊन रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन, विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
अध्यक्षस्थानी – मा. आमदार श्री. चंद्रकांत सोनवणे त
शुभारंभ प्रसंगी माजी आमदार सौ.लताताई सोनवणे , जळगाव जिल्हा सहकारी बँक चे संचालक घनश्याम भाऊ अग्रवाल , महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ लि. चे राज्य उपाध्यक्ष श्री रोहित निकम , कृ.उ.बा. समिती सभापती श्री. नरेंद्र पाटील, उपसभापती श्री विनायक चव्हाण , भाजप चे मंडल अध्यक्ष कांतिलाल पाटील , नरेंद्र पाटील आणि पिंटू पावरा, मंगला ताई पाटील , संध्याताई महाजन , स्वाती बडगुजर , अनिता शिरसाठ, मनिषा पाटील , शितल देवराज , सविता पाटील, कल्पना पाटील , रावसाहेब पाटील, शिवराज पाटील, गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, मनोज सनेर , मिलिंद पाटील , सुनिल जैन , सुनिल अग्रवाल, नंदकिशोर पाटील, नंदकिशोर सांगोरे , , नितीन पाटील रोहिदास सोनवणे , जितेंद्र देशमुख हे मान्यवर तसेच पदाधिकारी, व्यापारी आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
💬 “शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सुविधा व विकास हीच आमची प्राथमिकता आहे!”