शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत अभियंता दिन साजरा

शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत अभियंता दिन साजरा
चोपडा महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन), चोपडा येथे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंते मा. डिगंबर सुदामराव वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अभियंता या व्यवसायाचे महत्त्व, जबाबदाऱ्या व समाजातील योगदान याबाबत मार्गदर्शन केले. नगरपरिषदेचे अभियंता सचिन देसले यांनीही विशेष उपस्थिती दर्शवली.
स्थापत्य विभागाचे वरिष्ठ व्याख्याते प्रा. एस. इ. शिसोदे यांनी कवितेद्वारे अभियंत्रिकीचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. व्ही. एन. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी अभियंता होण्यासाठी कष्ट, शिस्त, तांत्रिक ज्ञान व सामाजिक बांधिलकी आवश्यक असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील व सचिव मा. डॉ. स्मिता संदीप पाटील यांनी सर्वांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्युत विभाग प्रमुख प्रा. कमलेश एस. पाटील यांनी केले.






