चोपड्याच्या रेड लाईट एरीयावर छापा, ५० पेक्षा अधिक महिलांची सुटका
महा पोलीस न्यूज | २१ मार्च २०२४ | चोपडा येथील रेड लाईट एरीयावर पोलिसांनी बुधवारी रात्री ६ ते ८ वाजता छापा टाकत असून मोठी कारवाई केली आहे. एका बनावट ग्राहकाला पाठवत पोलिसांनी एकाचवेळी कारवाई केल्याने वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या ११ मालकीण महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल ५० पीडित महिलांची सुटका केली असून त्यांना आशादिप वसतिगृहात पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, चोपडा शहर पोलीस निरीक्षक धोंडीबा साळवे आदींसह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीत नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक ३४ मध्ये अनधिकृतपणे पत्र्याचे शेड लावुन मोठ्या प्रमाणात पिडीत महीलांना अडकवून त्यांच्याकडुन देहविक्रीचा व्यवसाय करुन काही लोक कुटूंणखाना चालवित असल्याबाबत पोलिसांना खबर मिळाली होती. त्यानुसार दि.२० रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी त्या ठिकाणी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला व पंचाना नगरपरिषदेच्या मागे वार्ड क्रमांक ३४ मध्ये पाठवून तेथे देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना चालवित असल्याची खात्री करण्याबाबत कळविले होते.
झोपडीत देहविक्रीचा व्यवसाय करुन कुटूंणखाना सुरू असल्याची खात्री झाल्याने पथकाने छापा मारला असता ११ महीला आरोपी स्वतःचे फायद्यासाठी त्यांचे ताब्यातील झोपड्यामध्ये एकूण ५० महीलांना अडकवून त्यांना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्याकडून कुटूंणखाना चालवितांना मिळून आल्या. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला स्त्रिया व मुलीचे अनैतीक व्यापारास प्रतिबंध अधिनियम सन १९५६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच ५० पीडित महिलांची सुटका करुन त्यांना आशादिप सुधारगृह जळगांव येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी मालकीण महिला संशयीत आरोपी शर्मिला काले तमंग वय ४८ वर्ष रा.नारायणवाडी ता.चोपडा, उषा युवराज धोटे वय ४० वर्ष रा.वॉर्ड नं ३४ रा.नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि.जळगांव, किरण हरी लांबा वय ४० वर्ष रा.होलशीमन काठमांडु नेपाळ ह मु रा वॉर्ड नं ३४ रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव, मिराबाई चिंतामण चौधरी वय ४५ वर्ष रा.गांधलीपुरा अंमळनेर ह मु वॉर्ड नं.३४ रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता.चोपडा जि. जळगांव, मंगलाबाई रमेश मराठे वय ५८ वर्ष रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव, नुरजहाँ बेगम अकबर शेख वय ४८ वर्ष रा.आसमसोल ब्रम्हचारी विद्यालय कालीपुर गेट कोलकाता ह मु रा वॉर्ड नं ३४ रा.नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव, आसमा बेगम अब्दुल्ला शेख वय ३५ वर्ष अनंत बिल्डीग कळंबोली रोड रायगड ह मु रा वॉर्ड नं ३४ रा.नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव, सुभद्रा पुम्या नायक वय ४० वर्ष रा वॉर्ड नं ३४ रा.नगरपालीका पाठीमागे चोपडा ता.चोपडा जि. जळगांव, माया बाप बख्नु लांमा वय ५४ वर्ष रा.सिक्कीम ह मुरा वॉर्ड नं ३४ रा. नगरपालीका पाठीमागे चोपडा ता. चोपडा जि. जळगांव, संगीता जित बहादुर थापा वय ५३ वर्ष रा.नारायण वाडी चोपडा हमु रा वॉर्ड नं ३४ रा.नगरपालीका पाठीमागे चोपडा ता.चोपडा जि. जळगांव, सुनिता देवी फौजी मंडल वय ४० वर्ष रा. गोणगा अभय नगर कोलकाता ह मुरा वॉर्ड नं ३४ रा.नगरपालीका पाठीमागे चोपडा ता.चोपडा जि.जळगांव यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, उपनिरीक्षक अनिल भुसारे, उपनिरीक्षक योगेश्वर हिरे, कर्मचारी जितेंद्र सोनवणे, विलेश सोनवणे, दिपक विसावे, हरिषचंद्र पवार, शेषराव तोरे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, महेंद्र साळुंखे, सुभाष सपकाळ, संदीप भोई, विद्या इंगळे, शुंभागी लांडगे, रत्नमाला शिरसाठ, रविंद्र दिलीप पाटील, लव सोनवणे, युनुस शहा, प्रकाश मथुरे, प्रमोद पवार, रविंद्र बोरसे, मदन पावरा, विजय बच्छाव, अनिता हटकर यांनी केली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :