चोरीच्या गुन्ह्यातील फरार चोरट्याच्या मुस्क्या आवळल्या

जळगाव;- अपार्टमेंट मध्ये 75 हजार रुपयांची चोरी करून तीन महिना पासून पसार असलेल्या चोरट्याला पोलिसांनी शिरपूर तालुक्यातील आर्वी येथून एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. प्रवीण दारसिंग पावरा असे आरोपीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की भुसावळ रोडवरील चांडक हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या अपारमेंट मध्ये कुंदन सोनी हे वास्तव्याला असून त्यांच्या घरात कानबाई उत्सव असल्याने रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता. याची संधी साधून प्रवीण दारसिंग पावरा वय 21 रा. हिवरखेडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने घराच्या खिडकीतून आज प्रवेश करून 14 ग्रॅम सोन्याची पोत व दोन मोबाईल असा एकूण ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोहेकों दत्तात्रय
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्याकडे दिला होता. त्यांनी पथकातील योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करीत संशयीत प्रवीण पावरा याला आर्वी धुळे येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.