मेहुणबारे पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना अटक

मेहुणबारे पोलिसांची कारवाई; अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना अटक
उंबरखेडमधील आरोपींकडून तलवार आणि कुकरी जप्त
मेहुणबारे : चाळीसगाव पोलीस उपविभागातील मेहुणबारे पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन तरुणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक धारदार तलवार आणि एक कुकरी जप्त केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, २ ऑगस्ट २०२५ रोजी मेहुणबारे पोलिसांना उंबरखेड गावात दोन इसम बेकायदेशीर शस्त्रे बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुकलाल सुरेश सोनवणे आणि किरण यशवंत सोनवणे (दोघे रा. उंबरखेड, ता. चाळीसगाव) यांना भिका सीताराम गायकवाड यांच्या घराजवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनापरवाना असलेली एक धारदार लोखंडी तलवार आणि एक धारदार लोखंडी कुकरी जप्त करण्यात आली.
या दोन्ही आरोपींविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) आणि १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई प्रभारी अधिकारी प्रवीण दातरे, सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, विकास शिरोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार, भूषण बाविस्कर, ईश्वर देशमुख यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी चाळीसगाव परिसरातील तरुणांना असा प्रकार करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. तसेच, नागरिकांना असे कृत्य निदर्शनास आल्यास मेहुणबारे पोलीस स्टेशन किंवा जळगाव नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आ






