जळगाव -आयएमए जळगावतर्फे दरवर्षी बॉक्स क्रिकेट स्पर्धा होत असते. २२, २३ व २४ नोव्हेंबर रोजी रॉयल टर्फ मेहरूण येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जवळजवळ १२० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. डॉक्टर सदस्य व्यतिरिक्त त्यांची कुटुंब ही या स्पर्धेत सहभागी होतात.
बाळ गोपाळांसाठी सुद्धा सामने घेतले जातात. यावर्षी बॉक्स क्रिकेटचे औचित्य साधून लहान मुलांना हिंदू संस्कृतीतील वासुदेव किंवा दान पावल्या याची ओळख व्हावी या दृष्टीने रविवारच्या रोजी स्पर्धेठिकाणी दोन वासुदेव बोलवण्यात आले होते. त्यावेळी सर्व लहान मुलं व उपस्थित सर्व खेळाडूंना हिंदू संस्कृतीतील वासुदेव काय असतो, याबद्दल डॉक्टर विलास भोळे यांनी माहिती दिली.
स्वर्गवासी आजोबा किंवा वडील यांच्या नावाने दान दिल्यानंतर वासुदेव त्यांच्या नावाचा उच्चार करून गाणी गातात, हे संस्कार लहान मुलांना अवगत करून दिले.
हे करण्यामागचा उद्देश असा की आजकालच्या लहान मुलांना नाताळातील सांताक्लॉज माहीत असतो पण हिंदू संस्कृतीतील वासुदेव हा संस्कार माहित नाही. अनेक लहान मुलांनी आपल्या स्वर्गवासी आजोबांचे नाव सांगून वासुदेवाने म्हटलेल्या गाण्यातून त्यांचे स्मरण केले.
आय एम ए जळगावच्या सचिव डॉक्टर अनिता भोळे व डॉक्टर विलास भोळे यांच्या संकल्पनेतून ही योजना आखण्यात आली. सर्व आयएमए सदस्यांनी या योजनेचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी आय एम ए हेडक्वार्टरचे सी डब्ल्यू सी सदस्य डॉ.अनिल पाटील व आय एम ए महाराष्ट्राचे एसबीआय सचिव डॉक्टर स्नेहल फेगडे ही उपस्थित होते.