गावठी पिस्तूल घेऊन फिरणारे तिघे जेरबंद ,तीन गावठी पिस्तुल जिवंत काडतूस जप्त
जळगाव : -तीन तरुण कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजवीत असताना त्यांना पोलिसांनी पिंप्राळा हुडको परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा हुडको भागात तीन जण गावठी पिस्तूल लावून परिसरात दहशत माजवित असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई कारण्याच्या सुचना दिल्या. पथकाने सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६
वाजता कारवाई करत संशयित आरोपी कल्पेश उर्फ प्रवृध्द गुलाब सपकाळे (वय २१ रा. हुडको), गौरव समाधान सोनवणे (वय २१ रा. गॉलेक्सी कॉलनी) आणि लिलाधर देवीदास कोळी (वय ३५ रा. हिराशिवा कॉलनी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ हजार रूपये किमतीचे तीन गावठी पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.